breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे बेरोजगारी’; काशिनाथ नखाते

बेरोजगारीकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन

पिंपरी. : एकीकडे भारत आणि महाराष्ट्र विकासाच्या दिशेने जात असल्याचे आभासी चित्र निर्माण केले जात असून भारताची आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कठीण परिस्थितीतून जात आहे. हि अर्थव्यवस्था रोजगार विरहित आहे महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला पळवल्याने महाराष्ट्राच्या तरुणांचे नुकसान झाले राज्यात ८१ हजार कोटींची केवळ घोषणा झाली आज बेरोजगारीचा दर ९.२ % वर आलेला आहे याला सरकार जबाबदार असून बेरोजगारांसाठी काय केले सांगा ? सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे प्रचंड बेरोजगारीत वाढ झाली असल्याची टीका राष्ट्रवादीचे कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी केली .

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष -शरदचंद्र पवार, नॅशनॅलिस्ट ट्रेड युनियन फेडरेशन, कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे बेरोजगारीच्या प्रश्नावर आज थरमॅक्स चौक चिंचवड येथे आंदोलन करण्यात आले .

यावेळी राष्ट्रवादी असंघटित कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नखाते, प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने, निमंत्रक लाला राठोड,इरफान चौधरी, विजय तळेकर,संजय कांबळे,गीता मोरे, अरुणा कोरे, सलीम डांगे, अशोक जाधव, अंकुश जेवळे, स्वप्नील पाटील, संजय गायकवाड आदी उपस्थित होते .

हेही वाचा –        जगभरात मंकीपॉक्सचे थैमान; पृथ्वीराज चव्हाणांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली प्रोटोकॉल लागू करण्याची मागणी

नखाते यांनी सरकारच्या चुकीच्या धोरणांवर प्रहार करत म्हणाले की “भारतात तरुणांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असून १८ ते ३५ वयोगटातील तरुणांची संख्या ६५ कोटी पर्यंत आहे या तरुणांसाठी नोकरीचा कार्यक्रम राबवणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात उच्चशिक्षित व तज्ञ तरुणांच वाढलेले प्रमाण मोठे असून त्यांचे हाताला कामच मिळत नाही, भ्रमनिरास होऊन अनेकजन
आत्महत्येकडे वळत आहेत. राज्यातील कष्टकरी, कामगार वर्ग, स्थलांतरित कामगार कुशल – अकुशल अशा सर्व कामगारांना काम मिळत नाही. अर्थसंकल्पात केवळ रोजगार वाढीसाठी २ लाख कोटींची तरतूद केल्याची घोषणा केली जाते मात्र प्रत्यक्षात काही लाभ होत नाही. ज्याना काम आहे जे कामगार काम करत आहेत त्यांना असुविधा, भाववाढ व महागाईच्या चक्रामध्ये कामगार वर्ग फसलेला असून वेतन परवडत नाही अशी परिस्थिती असताना सरकार केवळ घोषणा करत आहे वेदांता फॉक्सकॉन ,टाटा एअर बस ,बल्क ड्रगपार्क असे महाराष्ट्रातले अनेक प्रकल्प गुजरातला गेल्याने नुकसान झाले आहे ”

बेरोजगारी दर ९.२ कसा? गुजरात तूपाशी महाराष्ट्र उपाशी, रोजगार द्या रोजगार , सरकार जाहिरातीत तरुण बेरोजगारीत असे फलक घेऊन घोषणा दिल्या . याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे अन्यथा तरुण महाराष्ट्रभरात मोठे आंदोलन उभे करतील असा इशारा आज देण्यात आला

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button