पिंपरी चिंचवडमधील पक्षाची पडझड रोखण्यासाठी अजित पवार ‘ॲक्शन मोड’मध्ये..!
नवीन शहराध्यक्ष पदाबाबत चर्चा आणि ‘आउटगोइंग’ रोखण्यासाठी बोलवली तातडीची बैठक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/07/www.mahaenews.com-2024-07-17T161741.934-780x470.jpg)
पिंपरी : राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी चिंचवड मध्ये सुरू लागला आहे. शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह भोसरी विधानसभेतील अनेक माजी नगरसेवकांनी अजित पवारांची साथ सोडत शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही पडझड रोखण्यासाठी अजित पवार आता ‘ॲक्शन मोड’मध्ये आले आहेत. त्यांनी सुरू असलेली आउटगोइंग रोखण्यासाठी आणि नवीन शहराध्यक्ष पदाबाबत चर्चा करण्यासाठी उद्या (दि.१८) सकाळी ८ वाजता पुण्यातील नवीन सर्किट हाऊस येथे आजी, माजी नगरसेवकांसह सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली असल्याची माहिती मिळत आहे.
हेही वाचा – ‘२ महिन्यांनी जेव्हा जाग येईल तेव्हा राज ठाकरे बोलतात’; शरद पवारांचा पलटवार
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्या पुण्यात पिंपरी चिंचवड शहरातील माजी नगरसेवक तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. सध्या भोसरी विधानसभेतील बरेच पदाधिकारी व माजी नगरसेवक यांचा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश झाला आहे. त्याच अनुषंगाने सुरू असलेली ही पडझड रोखण्यासाठी पक्ष संघटना टिकवण्यासाठी उपाययोजना यावर चर्चा केली जाणार आहे. तसेच नवीन शहराध्यक्ष पदाकरिता माजी महापौर योगेश बहल, माजी विरोधी पक्ष नेते नाना काटे, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, जगदीश शेट्टी यांच्या नावावर चर्चा होऊ होणार आहे.