आता कचरा वेचकालाही होणार दंड ; स्वच्छच्या करारात महापालिकेकडून बदल
पुणे : शहरातील कचरा समस्या सोडविण्यात महापालिकेस सर्वाधिक हातभार लावणाऱ्या स्वच्छ संस्थेला माजी नगरसेवकांकडून मोठ्या प्रमाणात विरोध झाल्यानंतरही महापालिकेने अखेर या संस्थेस पाच वर्षांची मुदतवाढ देत संस्थेसोबत जानेवारी २०१९ पर्यंतचा करार केला आहे.
मात्र, हा करार करताना स्वच्छ बाबत असलेल्या तक्रारींची गंभीर दखल घेत करारातील तरतुदींमध्ये बदल केले असून, कचरा वेचकांमुळे रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी कचरा गोळा असेल, तर त्यांना ५०० रुपये दंड केला जाणार आहे. तसेच हा प्रकार वारंवार घडल्यास संबंधित भागातून स्वच्छचे काम काढून घेतले जाणार असल्याच्या तरतुदीचा समावेश आहे.
हेही वाचा – ड्रंकन ड्राईव्हमध्ये १६८४ परवाने निलंबित करण्याचा प्रस्ताव
दरम्यान, कचरा संकलनाच्या कामात सुसूत्रता यावी, सार्वजनिक ठिकाणी कचरा पडू नये, या उद्देशाने करारनाम्यात सुधारणा केली असल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. स्वच्छचे शहरात सुमारे ३८५० कर्मचारी असून, त्यांच्या माध्यमातून १० लाख मिळकतींचे कचरा संकलन केले जाते. त्यामुळे महापालिकेचा कचरा संकलनाचा खर्च वर्षाला ११२ कोटींनी वाचतो.
– कचरा वेचकांमुळे रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी कचरा गोळा होत असेल तर त्यांना ५०० रुपये दंड केला जाणार आहे.
– हा प्रकार वारंवार घडल्यास संबंधित भागातून स्वच्छचे काम काढून घे-तले जाणार.
– शहरात अन्य संस्थांनाही काम करण्याची मुभा असणार.
– अन्य संस्थांसोबत ११ महिन्यांचा तात्पुरता करार.
– फिडर पाॅइंट स्वच्छ करण्याची जबाबदारी कचरा वेचकांची असणार.