‘संतांच्या अनुकरणाने काम करतं राहिल्यास समाज त्यांच्या माघे उभा राहतो’; खासदार श्रींरंग बारणे
पंढरपूरला पायी जाणाऱ्या दिंडीचा झाला सन्मान
![Srirang Barne said that society will stand behind the saints if they continue to work](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/Pimpri-Chinchwad-1-2-780x470.jpg)
वडगाव मावळ | अखिल भारतीय वारकरी मंडळ मावळ तालुका व श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थान यांचे संयुक्त विद्यमाने रविवार दि. २३ जून २०२४ रोजी श्री पोटोबा महाराज मंदिरात सालाबादप्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपुर ला पायी जाणाऱ्या मावळ तालुक्यातील दिंडी चा ताडपत्री देऊन व दिंडीतील प्रमुख अध्यक्ष, तुळशीवृंदावनधारक महिला भगिनींचा सन्मान, मावळ भाजपचे विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्रआप्पा भेगडे यांचे विशेष सहकार्यातुन अखिल भारतीय वारकरी मंडळ अध्यक्ष ह.भ.प.प्रकाश महाराज बोधले व मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग आप्प्पा बारणे यांचे शुभहस्ते करण्यात आला.
यावेळी ह.भ.प.मंगल महाराज जगताप, संतोष महाराज काळोखे, सुखदेव महाराज ठाकर, दत्तात्रय महाराज शिंदे मावळ तालुका अध्यक्ष शांताराम बोडके,दत्तात्रय लायगुडे, उद्योजक शंकरराव शेळके, मावळ भाजपाचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर,मा सभापती गुलाबराव म्हाळसकर, मा उप सभापती गणेश गायकवाड, शांताराम कदम ,प्रविण चव्हाण, मावळ तालुका खरेदी विक्री संघांचे मा. व्हा. चेअरमन पंढरीनाथ ढोरे,वडगाव सोसायटीचे चेअरमन निलेश म्हाळसकर मा. चेअरमन बाळासाहेब म्हाळसकर, पंढरीनाथ भिलारे, प्रकाश कुडे, भाऊसाहेब ढोरे, संजय गांधी निराधार योजना मा. अध्यक्ष नारायणराव ठाकर, मा. नगराध्यक्ष मयूर ढोरे, मा. सरपंच नितीन कुडे, भरतशेठ म्हाळसकर, धनंजय नवघणे आदिसह तालुक्यातील वारकरी मंडळ व ग्रामस्त मोठया संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा – ‘राज्यात पुढील मुख्यमंत्री काँग्रेसचाच’; विश्वजित कदम यांचं विधान चर्चेत
यावेळी ह.भ.प.प्रकाश महाराज बोधले व खासदार श्रींरंग आप्पा बारणे यांनी मनोगत व्यक्त केले,संतांच्या अनुकरण करून काम करत राहिल्यास समाज त्यांच्या माघे उभा राहत असतो, याचा आदर्श म्हणून 14 वर्षे सातत्याने श्री पोटोबा देवस्थान व अखिल भारतीय वारकरी मंडळ हे कार्य करत आहे, अण्णांची आठवण काढत असताना कामाचा पाठपुरावा कसा असावा हे मा मुख्य विश्वस्त सोपानराव अण्णा म्हाळसकर यांचेकडून शिकणे सारखं होते, म्हणून पुढील काळात देखील या कार्याला सर्वोतपरी मदत करेल असे अश्वासन खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी दिले. कार्यक्रमाचे आयोजन देवस्थान चे अध्यक्ष किरण भिलारे, उपाध्यक्ष गणेशआप्पा ढोरे,विश्वस्त अनंता कुडे,चंद्रकांत ढोरे, ऍड अशोकराव ढमाले, तुकाराम ढोरे,सुभाषराव जाधव, सुनिता कुडे, व अखिल भारतीय वारकरी मंडळचे तालुका अध्यक्ष शांताराम बोडके, संतोष कुंभार यांनी केले.
जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते शंकरराव पगडे, शांताराम म्हाळसकर व मा नगरसेवक किरण म्हाळसकर यांनी महाप्रसादाचे नियोजन केले होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवस्थान चे विश्वस्त सचिव अनंता कुडे, सूत्रसंचालन ह.भ.प.गणेश महाराज जांभळे, व आभार नारायणराव ढोरे यांनी मानले.