राजकीय सभांवर कोट्यावधींचा खर्च, त्याचं काय? इंदुरीकर महाराजांचा सवाल
![Indurikar Maharaj said that from where did he get 5 crore rupees to hold the meeting](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/03/Indurikar-Maharaj-780x470.jpg)
Indurikar Maharaj | प्रसिद्ध किर्तनकार आणि सतत आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असणारे इंदुरीकर महाराज पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. इंदुरीकर महाराज यांनी सध्या राज्याच्या राजकारणावर भाष्य केलं आहे. सध्याचं राजकारण आणि वारकरी सांप्रदायाची तुलना कधीही होऊ शकत नाही अशी टीका त्यांनी केली. ते सोलापूर जिल्ह्यातील कुंबेज गावामध्ये किर्तन कार्यक्रमात बोलत होते.
इंदुरीकर महाराज काय म्हणाले?
किर्तनकारांनी पाच हजार रूपये जास्त मागितले तर लोकं म्हणतात धंदा मांडलाय. सभा घ्यायला ५ कोटी रूपये आले कुठून? राजकीय सभा आणि किर्तन यांची तुलना कधीच होणार नाही. किर्तनकारांच्या सभेला लोकं येतात. राजकीय सभेला लोकं आणली जातात. त्यांना पाण्याच्या बाटल्या समोसे दिले जातात, असं इंदुरीकर महाराज म्हणाले.
हेही वाचा – वंचित बहुजन आघाडीसह सुती तुटली? संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
याआधी इंदुरीकर महाराजांनी नृत्यांगणा गौतमी पाटील यांच्या गाण्यावर भाष्य केलं होते. गौतमी पाटील ही तीन गाण्यांसाठी तीन लाख रूपये घेते. आम्ही पाच हजार रूपये मागितले तर लगेच आमच्यावर बाजार मांडल्याचा आरोप केला जातो, असं इंदुरीकर महाराज म्हणाले.