Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्र

अभिनेत्री प्रार्थना बेहेरेकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख, नंतर मागितली माफी

Prarthana Behere | शिवजयंतीनिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. लातूरच्या उदगीर येथील एका मॉलच्या उद्धाटनासाठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे दाखल झाली होती. त्यावेळी उद्धाटनादरम्यान शुभेच्छा देताना सलग चार-पाचवेळा तिने महाराजांचा एकेरी शब्दात उल्लेख केला. त्यामुळे लातूरमधील शिवभक्तांकडून तिचा निषेध करण्यात येत आहे.

मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री प्रार्थना बेहेरे लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे एका व्यापारी प्रतिष्ठानच्या कार्यक्रमासाठी आली होती. यावेळी तिने छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केला. अभिनेत्रीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. संतप्त झालेल्या शिवप्रेमींनी उदगीर शहरामध्ये अभिनेत्रीचे लागलेले बॅनर फाडत संताप व्यक्त केला. अभिनेत्रीच्या ही बाब लक्षात आल्यानंतर तिने नवा व्हिडीओ बनवून शिवप्रेमींची माफी मागितली आहे.

हेही वाचा    –    ..तर मग वेगळा कायदा करायची गरज काय? छगन भुजबळांचा सवाल 

प्रार्थना बेहेरे म्हणाली आहे, आज मी उदगीर येथे किसान मॉलच्या उद्घाटनाला आले होते. तिथे आल्यावर माझ्याकडून चुकून काही बोलण्यात आले असेल तर त्या बद्दल मी तुम्हा सर्वांची माफी मागू इच्छिते. कृपा करून मला माफ करा, माझा त्या बोलण्याचा उद्देश चुकीचा नव्हता. मी परत म्हणते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त तुम्हा सर्वांना शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराज की जय, असे प्रार्थनाने तिच्या या माफीनाम्यात म्हटले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button