Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

डबल डेकर बसमुळे ठाणेकरांचा प्रवास अधिक सुखकर; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे लोकार्पण

मुंबई | ठाणे महानगरातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे लोकार्पण उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी महापालिका भवन येथून लुईसवाडी ते पुन्हा महापालिका भवन असा प्रवास या डबलडेकर बसमधून केला. या बसमुळे ठाणेकरांचा प्रवास अधिक सुखकर, आरामदायी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी महापौर शर्मिला पिंपळोलकर, महापालिका सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, उपमहापौर कृष्णा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा

‘ईव्हीएममध्ये फेरफार केल्यास आरपारची लढाई!’; ममता बॅनर्जींचा थेट इशारा

जी.सी.सी तत्वावर या बसेस ठाणे परिवहनमध्ये दाखल होणार असून त्याचा कोणताही भार परिवहन सेवेवर पडणार नाही. या डबलडेकर बसमध्ये एकाचवेळी 65 प्रवासी बसू शकतात तर 33 प्रवासी उभे राहून प्रवास करु शकतील. सद्यस्थितीत ही बस तीन हात नाका ते गायमुख या मार्गावर धावणार आहे. इलेक्ट्रिक बस असल्यामुळे ठाणेकरांचा प्रवास पर्यावरणपूरक असा होणार असून परिवहन ताफ्यात आणखी 9 बसेस लवकरच दाखल होणार आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button