शिवजन्मोत्सव सोहळा | जाणून घ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास
![Know the history of Chhatrapati Shivaji Maharaj](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/02/Chhatrapati-Shivaji-Maharaj-780x470.jpg)
Shiv Jayanti | छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० शिवनेरी किल्यावर झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी १८ पगड जातींना एकत्र करत स्वराज्य उभे केले. आज १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची तारखेनुसार जयंती आहे. शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांवर व रयतेवर जीवापाड प्रेम केले.
जाती-पातीच्या भिंती तोडून सर्वांना सन्मान दिला. त्यामुळेच त्यांना रयतेचा राजा म्हटले जाते. प्रत्येक मोहिमेनंतर छत्रपती शिवाजी महाराज तलवारी मिरवणाऱ्या धारकऱ्यांना ‘मानकरी’, भाला फेकणाऱ्या निष्णात सैनिकाचा ‘भालेराव’ अशी उपाधी देऊन गौरव करायचे. जीवावर उदार होवून चढाई करणाऱ्या सैनिकांना सोन्याचे कडे द्यायचे.
हेही वाचा – ‘पोलीस काय करणार? भाषण रेकॉर्ड करून बायकोला दाखवतील’; नितेश राणेंचं वादग्रस्त विधान
शिवाजी महाराजांना मोठी दूरदृष्टी होती. स्वराज्यासाठी काय काय केले जाऊ शकते, याचा विचार त्यांच्याकडे होता. स्वराज्य स्थापनेनंतर ते विस्तारले कसे जाईल, याचा ते सदैव विचार करत असत. त्यांनी बांधलेले गडकिल्ले हे याचे उत्तम उदाहरण आहे. हे गडकिल्ले इतके अभेद्य असत की शत्रूला त्यावर चाल करून जाताना हजारदा विचार करावा लागे.
गनिमी कावा हे शिवाजी महाराजांचे प्रमुख हत्यार होते. अनेक मोहिमा, लढाया छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी कावा करून जिंकल्या होत्या. शत्रूचे सैन्य कितीही प्रचंड असले तरी काही मावळ्यांच्या मदतीने शिवाजी महाराजांनी शत्रूचा पाडाव केला आहे. स्वराज्य स्थापन करताना शिवाजी महाराजांनी शेकडो किल्ले बांधले आणि जिंकले आहेत.