Weight Loss Tips | वजन कमी करण्यासाठी ‘हे’ स्नॅक्स ठरतील उपयुक्त
![These snacks will be helpful for weight loss](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/01/Weight-Loss-1-780x470.jpg)
Weight Loss | हलक्या भूकेसाठी खाल्लेल्या स्नॅक्समुळे कोलेस्ट्रॉल वाढते, ज्याचा आपल्या हृदयावरही वाईट परिणाम होतो. अशा वेळी चवीबरोबरच आरोग्याचीही काळजी घेणं गरजेचं आहे. तुमची भूक भागवण्यासाठी तुम्ही काही आरोग्यदायी पदार्थांचा तुमच्या आहारात समावेश करू शकता.
मोड आलेल्या कडधान्यांचा चाट
मोड आलेल्या कडधान्यांचा चाट हा आरोग्यदायी आणि चवदार नाश्ता मानला जातो. यासाठी उकडलेले कडधान्य एका बाऊलमध्ये घेऊन त्यात लिंबू मिक्स करून खा.
हेही वाचा – ‘..त्यामुळे सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार नाही’; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
चना चाट
जर तुम्हाला भूक कमी वाटत असेल तर तुम्ही हरभरा उकडूनही खाऊ शकता. हा प्रथिने युक्त नाश्ता आहे. तसेच, तुमच्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्यापासून थांबते.
मूग डाळ चिल्ला
जर तुम्ही हेल्दी नाश्ता शोधत असाल तर मूग डाळ चिल्ला हा एक उत्तम पर्याय आहे. यामध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात.
वजन कमी करण्यासाठी योग्य आहारासोबत व्यायाम ही करणे आवश्यक आहे. ह्यामुळे आपलं शरीर तंदरुस्त राहते.