केंद्र सरकार आता स्वस्तात गव्हाचे पीठ विकणार? एक किलोसाठी एवढा दर
![The central government will now sell wheat flour at a cheaper price](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/12/Bharat-Atta-780x470.jpg)
Bharat Atta : वाढत्या महागाईचा विचार करता केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता सर्वसामान्यांना गहू आणि गव्हाचे पीठ स्वस्त दरात मिळणार आहे. गहू आणि गव्हाचे पीठ योग्य दरात उपलब्ध व्हावे यासाठी केंद्रीय भांडार, नॅशनल कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने गहू खरेदी करुन त्याचे पीठ प्रति किलो २७.५० रुपये इतक्या किरकोळ दरापर्यंत विकण्याचा निर्णय घेतला आहे.
यामध्ये सर्वसामान्यांना गहू आणि गव्हाचे पीठ ‘भारत आटा’ ब्रँड अंतर्गत मिळणार आहे. केंद्रीय भांडार, नाफेड, एनसीसीएफ आणि राज्य सरकारांच्या सहकारी संस्थांद्वारे प्रत्यक्ष अथवा फिरत्या विक्री केंद्रांवर ‘भारत आटा’ उपलब्ध होणार आहे.
हेही वाचा – धर्माच्या नावानं मतं मागायची? ठाकरे गटाचं पुन्हा निवडणूक आयोगाला पत्र
भारत आटा – सरकार का उपहार, हर नागरिक के लिए सामर्थ्य का संकल्प। #BharatAtta #FoodSecurity@RailMinIndia @fertmin_india @IndiaPostOffice @MIB_India pic.twitter.com/JKhaRzYPwh
— Department of Food & Public Distribution (@fooddeptgoi) December 3, 2023
सर्वसामान्य नागरिकांना योग्य दरात गहू उपलब्ध व्हावा हे यामागचे मुख्य उद्दिष्ट आहे. भारत सरकार केंद्रीय/राज्य सहकारी संस्थांच्या देशभरातली प्रत्यक्ष/फिरत्या किरकोळ विक्री केंद्रांच्या माध्यमातून प्रक्रिया करण्याकरता आणि पीठ बनवून विक्री करण्याकरिता गहू उपलब्ध करणार आहे.