Asia Cup 2023 : श्रीलंकेचा दहा विकेटने पराभव करत भारताने आठव्यांदा कोरले आशिया चषकावर नाव
![India won the Asia Cup for the eighth time](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/09/Asia-Cup-2023-780x470.jpg)
Asia Cup 2023 : आशिया चषक २०२३ चा अंतिम सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात आज खेळला गेला. श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारतीय संघाच्या गोलंदाजांसमोर श्रीलंकेच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. मोहम्मद सिराज, हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराहच्या बॉलिंगसमोर श्रीलंकाचा अवघ्या ५० धावांवर बाजार उठला.
श्रीलंकेने ठेवलेल्या ५१ धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने शानदार सुरुवात केली. आज रोहितऐवजी इशान किशन सलामीला आला. श्रीलंकेने दिलेले ५१ धावांचे माफक आव्हान भारताने ६.१ षटकात आरामात पार करत आठव्यांदा आशिया चषकावर नाव कोरलं आहे.
हेही वाचा – खासगी नोकरदारांसाठी निराशाजनक बातमी! PF वरील व्याजदर कमी होणार
𝘾𝙃𝘼𝙈𝙋𝙄𝙊𝙉𝙎 🏆
India storm to victory in the #AsiaCup2023 Final against Sri Lanka 🔥
📝: https://t.co/UROMhx0HTs pic.twitter.com/X4OOrGDJ6H
— ICC (@ICC) September 17, 2023
शुभमन गिल आणि ईशान किशन यांनी नाबाद ५१ धावांची भागिदारी करत भारताला सहज विजय मिळवून दिला. शुभमन गिल याने १९ चेंडूत सहा चौकारांच्या मदतीने नाबाद २७ धावांची खेळी केली. तर ईशान किशन याने १८ चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने नाबाद २३ धावांची खेळी केली.