राधाकृष्ण विखे पाटलांच्या अंगावर उधळला, कार्यकर्ता पोलिसांच्या ताब्यात
![The Dhangar Reservation Action Committee threw up a barrage on the body of Radhakrishna Vikhe Patal](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/09/radhakrishna-vikhe-patil-780x470.jpg)
मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन केलं जात आहे. दरम्यान, धनगर समाजही आरक्षणासाठी आक्रमक झाला असून या आंदोलकांनी थेट सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा उधळून जाहीर निषेध केला आहे.
राधाकृष्ण विखे पाटील हे सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी ते रेस्ट हाऊसमध्ये थांबले होते. धनगर समाजातील आंदोलक मंत्र्यांना निवेदन द्यायला आले. यावेळी त्यांनी विखे पाटील यांच्या अंगावर भंडाऱ्याची उधळन केली आहे. या प्रकाराने विखे पाटील आणि उपस्थित कार्यकर्ते काहीसे गोंधळले.
हेही वाचा – ‘OBC तून मराठा आरक्षण देणं अशक्य’; पंकजा मुंडे यांचं मोठं विधान
दरम्यान, आंदोलनकर्ते शेखर बंगाळे यांनी मीडियाशी संवाद साधताना राज्य सरकारला गंभीर इशारा दिला आहे. आम्ही आज भंडारा उधळला आहे. आमचा निषेध नोंदवला आहे. धनगर समाजाला अजूनही आरक्षण देण्यात आलेलं नाही. आमच्या प्रश्नाकडे लक्ष दिलं जात नाही. आम्हाला आरक्षण दिलं पाहिजे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावता कामा नये, असं सांगतानाच आम्हाला आरक्षण नाही दिलं तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या तोंडाला काळे फासल्याशिवाय राहणार नाही, असं शेखर बांगाळे म्हणाले.