Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची मोठी घोषणा!

नवी दिल्ली : कांदा निर्यातीवर शुल्क वाढ केल्याने महाराष्ट्रात शेतकरी आक्रमक झाले आहेत. महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये शेतकऱ्यांचं आदोलन सुरू आहे. राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांची भेट घेतली. या भेटीनंतर केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी मोठी घोषणा केली आहे.

मंत्री पीयूष गोयल म्हणाले, केंद्र सरकार नाफेड मार्फत दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार आहे. २४१० रूपये प्रतिक्विंटल भावाने ही कांदा खरेदी करण्यात येईल.

हेही वाचा – चांद्रयान-३ ची खिल्ली उडवल्याने प्रकाश राज झाले ट्रोल; दुसऱ्या ट्वीटमध्ये म्हणाले..

राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची दिल्ली येथे भेट घेतली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके हे देखील उपस्थित होते.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे हे कांदा निर्यात शुल्क वाढ केल्याने चांगलेच आक्रमक झाले आहेत. २ ते ५ रुपये किलोने कांदा विकावा लागला. त्यावेळी केंद्र सरकार कुठेही कांद्या उत्पादक शेतकऱ्याच्या मदतीसाठी उभं राहिलं नाही. वाहतूक खर्चही शेतकऱ्याच्या अंगावर पडला. आता दोन पैसे मिळण्याची आशा निर्माण झाली, तेव्हा केंद्र सरकारने निर्यात शुल्क वाढवून काद्याचे भाव पाडण्यााच षडयंत्र केलय, असा आरोप अमोल कोल्हे यांनी केलाय.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button