Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपुणेमहाराष्ट्रमुंबई

Maharashtra Weather : राज्यात पुढचे ४ ते ५ दिवस तुफान पावसाचा इशारा

पुणे : मान्सून दाखल झाल्यापासून राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. तर काही भागात जुलै महिन्याचा पंधरवडा आला तरी पाऊस झालेला नाही. त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. अशात हवामान खात्याने आता महाराष्ट्राला पुढच्या पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर मराठवाड्यासह इतर काही भागात मेघगर्जनासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

हेही वाचा – जया बच्चन यांच्यानंतर आता अभिनेता अभिषेक बच्चनही राजकारणात येणार?

मुंबई, पुणे, ठाणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या भागांमध्ये पाऊस कमी झाला. अशात आता हवामान खात्याकडून राज्यातील पाच दिवसांचा यलो अलर्ट जारी केला आहे. तर १७ जुलैला रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे जोरदार पाऊसाची शक्यता आहे. आज हवामान विभागाने कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे राज्यात आजही तुफान पाऊस असेल.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button