काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का? पंकजा मुंडे स्पष्टच म्हणाल्या..
![Pankaja Munde said that I will not join any party after leaving BJP](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/07/Pankaja-Munde-780x470.jpg)
मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे या गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, त्या काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत खुलासा केला आहे.
पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी २०१९ मध्ये भाजपची उमेदवार होते. माझा पराभव झाला. त्यानंतर गेली ४ वर्षे मी नाराज आहे. मी पक्ष सोडणार, अशा चर्चा सुरू झाल्या. मला स्वत:ला सिद्ध करायचं नाहीय. अनेक पक्षातील नेते देखील बोलत होते की, पंकजा मुंडे आल्या तर त्यांना पक्षात स्थान देऊ. मी सर्व हे सहजतेने घेतलं.
हेही वाचा – ‘आपल्या औकातीपेक्षा जास्त मिळालं तरच माणूस आनंदी राहतो’; नितीन गडकरी
मी राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची दोनदा भेट घेतली. आणि मी काँग्रेसच्या वाटेवर आहे, अशा बातम्या चालवण्यात आल्या. कोणत्याही बातमीवर प्रश्नचिन्ह टाकून कायदेशीर प्रश्न सोडवू शकता. माध्यमांना कोणतीही बातमी देताना स्त्रोत देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे या चॅनेल्सवर मानहानीचा दावा ठोकणार आहे, असा इशारा पंकजा मुंडे यांनी दिला आहे.
माझ्या भाषणाचे तुकडे काढून अर्थ लावले जातात. मला विधान परिषदेला दोन्ही वेळा फॉर्म भरायला सांगितला. पण ऐनवेळी सांगितलं गेलं की फॉर्म भरायचा नाही. मी काही बोलले नाही कारण तो पक्षाचा आदेश आहे. मी कुठलाही निर्णय डंके की चोट पण करेन. भाजपाचा विचार माझ्या रक्तात आहे. पक्ष हा सगळ्यात महत्वाचा आहे माझ्यासाठीय अप्रमाणिकपणा माझ्या स्वभावात नाही. मी मुद्यावर बोलते, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.