कर्नाटकात काँग्रेसकडून धर्मांतरविरोधी कायदा रद्द, सावरकरांचा धडाही वगळला

कर्नाटकमध्ये सत्ताबदल झाल्यानंतर काँग्रेस सरकारने भाजपाच्या काळात झालेल्या निर्णयांना बदलण्यास सुरूवात केली आहे. पूर्वीच्या भाजप सरकारने कर्नाटकमध्ये धर्मांतर विरोधी कायदा केला होता. तो कायदा आता कर्नाटक सरकारने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा ठराव राज्य मंत्रिमंडळाने मंजूर केला आहे. तसेच मंत्रिमंडळाने इतिहास विषयाचा अभ्यासक्रम बदलण्याला परवानगी दिली आहे.
कॅबिनेट मंत्री एचके पाटील म्हणाले की, करर्नाटक मंत्रिमंडळाने गुरूवारी तत्कालीन भाजप सरकारने आणलेला धर्मांतर विरोधी कायदा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने आणलेला धर्मांतर विरोधी कायदा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी अधिवेशनात या संदर्भात एक विधेयक मांडण्यास मंजुरी दिली आहे.
हेही वाचा – ‘जिथे प्रभू श्रीराम, तिथे हनुमान’ आदिपुरूषचा शो सुरू असताना वानराची एन्ट्री
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला वैचारिक अधिष्ठान देणाऱ्या विनायक दामोदर सावरकर आणि केशव हेडगेवार यांच्यावर इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात असलेला धडाही काढून टाकण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतलेला आहे. या दोघांवरील धडा मागच्यावर्षी अभ्यासक्रमात समाविष्ठ करण्यात आला होता. याशिवाय भाजपाने अभ्यासक्रमात जे जे बदल केले आहेत, ते हळूहळू वगळण्यात येतील, असंही त्यांनी सांगितले. तसेच शाळा आणि महाविद्यालयांमध्ये देवाच्या प्रार्थनेसोबत संविधानाच्या उद्देशिकेचेही वाचन अनिवार्य करण्यात आल्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतल्याचे कॅबिनेट मंत्री एचके पाटील यांनी सांगितले.





