पुणे: भाजपाच्या नेत्या डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन!
कन्या कल्याणी हिला पुत्ररत्न : सोशल मीडियावर दिली गोड बातमी
पुणे । विशेष प्रतिनिधी
पुण्यातील कोथरुड विधानसभा मतदार संघाच्या माजी आमदार तथा भाजपाच्या नेत्या डॉ. मेधा कुलकर्णी Dr. Medha Kulkarni यांच्याघरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. त्यांची कन्या कल्याणी हिला गुरूपुष्यामृत योगावर मुलागा झाला असून, त्याचा आनंद डॉ. कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर गोड बातमी देत साजरा केला आहे. आपल्या नातवासोबत त्यांनी फोटोही शेअर केला आहे.
२०१९ मध्ये कोथरुड विधानसभा मतदार संघातून निवडणुकीसाठी डॉ. मेधा कुलकर्णी यांना डावलण्यात आले होते. त्यानंतर पक्षाने त्यांची महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड केली होती. मात्र, कुलकर्णी पक्षाच्या निर्णयावर नाराज असल्याच्या चर्चा अनेकदा ऐकायला येत होत्या.
शिक्षण क्षेत्रासह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातही डॉ. कुलकर्णी कार्यरत आहेत. पुण्यातील सेवासदन डी.ई.एड. कॉलेजमध्ये प्राचार्यपदी त्या कामकाज पाहत आहेत. यासह भाजपाच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा असल्याने पक्षीय कार्यातही त्या सक्रिय दिसतात.
दरम्यान, नव्या पाहुण्याच्या आगमनामुळे कुलकर्णी कुटुंबियांत आनंदाचे वातावरण असून, डॉ. मेधा कुलकर्णी आता आजी झाल्या आहेत.