आशिष विद्यार्थी यांनी ६० व्या वर्षी केलं दुसरं लग्न, फोटो व्हायरल

मुंबई : चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी २०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी हिंदी, मराठी, तेलगू, कन्नड, इंग्लिश अशा जवळपास ११ भाषांमध्ये काम केलं आहे. दरम्यान आशिष विद्यार्थी यांनी चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे. त्यांनी वयाच्या ६० व्या वर्षी दुसरं लग्न केलं आहे.
आशिष विद्यार्थी यांनी आसामच्या प्रसिद्ध इंटरप्रिटर असणाऱ्या रूपाली बरूआशी लग्नगाठ बांधली आहे. त्यांनी आज जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत कोर्ट मॅरेज केलं आहे. सध्या त्यांचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
हेही वाचा – ‘पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना पाणी, आरोग्य, स्वच्छतेच्या सर्व सोयी पुरवा’; पालकमंत्री चंद्रकांत पाटील
आशिष विद्यार्थी यांचं हे दुसरं लग्न आहे. यापूर्वी त्यांनी राजोशी यांच्यासोबत लग्न केलं आहे. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. अभिनेत्याने अचानक दुसरं लग्न केल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.





