Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘काल राजकारणातील राखी सावंत-उर्फी जावेद एकत्र वडापाव खात होते’; नितेश राणेंची ठाकरेंवर बोचरी टीका

मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केंजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. लोकशाही जपण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असं उद्धव ठाकरे म्हणाले. दरम्यान, ठाकरे-केजरीवाल यांच्या भेटीवरून भाजप नेते नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नितेश राणे म्हणाले की, फुकटच्या पैशावर जगणारे हे सारे पंतप्रधान मोदींवर टीका करतात, फडणवीसांवर टीका करतात. मातोश्रीवर काल तर हस्यजत्राच झाली. उद्धव ठाकरेंनी याच केजरीवालांना राखी सावंतची उपमा दिलेली. राजकारणातली राखी सावंत म्हणजे अरविंद केजरीवाल असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. आता आम्ही असं म्हणायचं का की काल राजकारणातीलराखी सावंत-उर्फी जावेद एकत्र आले होते. एकत्र बटाटे खात होते.

हेही वाचा – ‘महाराष्ट्रात कार्यक्रम होऊ देणार नाही’; मराठी संघटनेचा थेट इशारा

उद्धव ठाकरे म्हणतात की मातोश्रीवर नाती जपली जातात. हा सर्वात मोठा जोक आहे. जयदेव साहेब, राज ठाकरे हसत असतील. राजकारणातील नाती तुम्ही जपलीच नाहीत. म्हणून तर तुमच्या वडिलांची दिवस रात्र सेवा करणाऱ्या राणे साहेबांना मारून टाकण्याची सुपारी तुम्ही दिलेली. स्वत: च्या चुलत भावाला राज साहेबांना कितीदा अपमानित केलेलं, असं नितेश राणे म्हणाले.

शिवसेना आणि स्वत:च्या नात्यांना सोडून सर्वांशी नाती जपली आहेत. नाती जपलेल्याचा जोक जर उद्धव ठाकरेंच्या तोंडी येत असेल तर मातोश्रीवर काल झालेली हस्यजत्राच. देशाच्या लोकशाहीवर थोडी जरी लाज असेल तर २८ तारखेला नव्या संसदेच्या उद्घाटनाला जावं. ह्यांचा राम मंदिरला विरोध, संसदेला विरोध. देशामध्ये जेव्हा जेव्हा क्रांतीकारी निर्णय घेतले आहेत तेव्हा तेव्हा यांनी विरोध केला आहे, असंही नितेश राणे म्हणाले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button