Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

कोलकाता डॉक्टर बलात्कार-हत्या प्रकरण: TMC च्या माजी आमदाराला अटक

कोलकाता | आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि निर्घृण हत्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला होता. आता या घटनेच्या दोन वर्षांनंतर एका मोठ्या कारवाईत तृणमूल काँग्रेसचे (TMC) माजी आमदार निर्मल घोष यांना गुरुवारी अटक करण्यात आली आहे. पीडित डॉक्टरच्या मृतदेहावर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने घाईघाईने अंत्यसंस्कार केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला असून, मृत डॉक्टरच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे.

पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून खारदाह पोलीस ठाण्यात नवीन एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे. दुसर्‍या शवविच्छेदनाची (Post-Mortem) शक्यता टाळण्यासाठी आणि हत्येशी संबंधित पुरावे नष्ट करण्यासाठी कुटुंबीयांच्या संमतीशिवाय घाईघाईने अंत्यसंस्कार उरकण्यात आले, असा आरोप पीडितेच्या वडिलांनी केला होता. दरम्यान, हा गुन्हा सीबीआय करत असलेल्या मुख्य बलात्कार आणि हत्या प्रकरणाच्या तपासापेक्षा वेगळा असून स्थानिक पोलीस या प्रकरणाचा तपास करत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा

पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर बादल यांच्यावर हल्ला; हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात

मुख्य आरोपी संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा

९ ऑगस्ट २०२४ रोजी आर. जी. कर हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये महिला डॉक्टरचा मृतदेह अत्यंत गंभीर स्थितीत आढळून आला होता. या घटनेनंतर देशभरात डॉक्टरांचे तीव्र आंदोलन आणि संतापाची लाट उसळली होती. सुरुवातीला कोलकाता पोलिसांनी आरोपी संजय रॉयला अटक केली होती; मात्र नंतर न्यायालयाच्या आदेशाने हा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. विशेष न्यायालयाने २० जानेवारी २०२५ रोजी या प्रकरणातील मुख्य आरोपी संजय रॉय याला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button