ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

रुपीनगर, तळवडे, सहयोगनगर परिसरातील नागरी समस्यांवर नगरसेविका शितल वर्णेकर आक्रमक!

PCMC: स्वच्छता, पाणीपुरवठा, ड्रेनेज, रस्ते व अतिक्रमणांवर तातडीने कार्यवाहीची मागणी

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी

रुपीनगर, तळवडे, सहयोग नगरसह चिखली परिसरातील विविध नागरी समस्यांबाबत स्थायी समिती सदस्या तथा नगरसेविका शितल वर्णेकर यांनी प्रशासनाकडे आक्रमकपणे पाठपुरावा सुरू केला आहे. नागरिकांना भेडसावणाऱ्या मूलभूत समस्यांचे तातडीने निराकरण करावे, अशी मागणी त्यांनी फ प्रभाग क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

या चारही परिसरातील नागरिकांकडून विविध नागरी समस्यांबाबत सातत्याने तक्रारी प्राप्त होत असून, नागरिकांना मूलभूत सुविधा वेळेत व दर्जेदार स्वरूपात उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावी, अशी मागणी वर्णेकर यांनी केली आहे.

आरोग्य विभागामार्फत स्वच्छता, फॉगिंग, कचरा संकलन आणि इतर प्रलंबित समस्यांचे तातडीने निराकरण करण्याची मागणी त्यांनी केली आहे. परिसरात नियमित आणि पुरेसा शुद्ध पाणीपुरवठा सुनिश्चित करण्याबरोबरच पाणीपुरवठ्याशी संबंधित तक्रारींचेही निराकरण करण्याची सूचना करण्यात आली आहे.

हेही वाचा

‘नाशिक फाटा–खेड एलिव्हेटेड कॉरिडॉर’साठी भूसंपादन ‘मार्किंग’ सुरू!

तसेच ड्रेनेज व सांडपाणी व्यवस्थेतील त्रुटी दूर करून तुंबलेल्या गटारी व चेंबरची नियमित स्वच्छता करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. स्थापत्य विभागाने प्रलंबित विकासकामे मार्गी लावावीत, रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत, खराब झालेले रस्ते व पदपथांची तातडीने दुरुस्ती करावी, असेही निवेदनात नमूद आहे.

सार्वजनिक रस्ते व पदपथांवर झालेले अनधिकृत टपऱ्या, अतिक्रमणे व अडथळ्यांवर नियमानुसार तात्काळ कारवाई करण्याची मागणीही वर्णेकर यांनी केली आहे. बंद अथवा खराब झालेले पदपथ दुरुस्त करून आवश्यक त्या ठिकाणी नवीन पदपथ उभारावेत, अशी मागणी त्यांनी केली. नागरी समस्यांवर तातडीने कार्यवाही करून करण्यात आलेल्या उपाययोजनांचा अहवाल उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.

“रुपीनगर, तळवडे, सहयोगनगर आणि त्रिवेणीनगर परिसरातील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळणे हा त्यांचा हक्क आहे. स्वच्छता, पाणीपुरवठा, ड्रेनेज, रस्ते, पदपथ आणि अतिक्रमणांसारख्या प्रश्नांकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहून तातडीने कार्यवाही करावी. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित या समस्या प्रलंबित ठेवून चालणार नाही. संबंधित विभागांनी वेळेत कामे पूर्ण करून त्याचा अहवाल द्यावा, यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करणार आहोत

– शितल वर्णेकर, नगरसेविका, भाजपा.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button