गणेशोत्सवासाठी वल्लभनगर आगारातून विशेष गाड्याचे नियोजन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/1-111.jpg)
पिंपरी – गणेशोत्सवासाठी गावाकडे जाणा-या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेवून पिंपरी-चिंचवड एसटी आगारातून जादा गाड्याचे नियोजन केले आहे. तसेच कोकणात जाणा-याकरिता विशेष गाड्या सोडल्या जाणार असून गुरुवार, शुक्रवार या एकूण 37 बस सोडण्यात येणार आहे. अशी माहिती वल्लभनगर आगार प्रमुख संजय भोसले यांनी दिली.
उद्या आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमान होणार आहे. त्याची सर्वत्र जोरदार तयारी सुरु आहे. पिंपरी-चिंचवड शहरात कोकणवासीय नागरिकांची संख्या जास्त आहे. तसेच, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणा-या प्रवाशांची संख्या वाढते. त्यामुळे वल्लभनगर आगारातून तीन दिवस कोकणाला 37 बस सोडल्या जाणार आहेत. मालवण सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, देवगड, राजापूर, वेंगुर्ला या मार्गावर या जादा गाड्यांची व्यवस्था केली आहे. तसेच, आरक्षणाची सुविधा देखील उपलब्ध केली आहे. सिद्धिविनायक प्रतिष्ठन कोकण प्रवासी संघ यांच्या वतीने गेल्या 18 वर्षापासून ग्रुप बुकिंग करून गाड्या सोडल्या जातात. त्याला देखील कोकणवासियांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
आगार प्रमुख संजय भोसले म्हणाले, कोकणवासियांनी 15 गाड्या बुक केल्या होत्या. आज एकूण 20 गाड्या सोडल्या जाणार आहेत. तसेच तीन दिवस कोकणसाठी जास्त गाड्या मागवून घेण्यात येणार आहेत. मागणीनुसार 37 गाड्या सोडण्याचे नियोजन आहे. टप्या-टप्याने कमी जास्त गाड्या सोडल्या जाणार आहेत. नारायणगाव, राजगुरुनगर, शिरुर या आगारातून गाड्या मागविल्या जाणार आहेत.