अजित पवार मुख्यमंत्री होणार का? शरद पवार म्हणाले,..

मुंबई : मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली दिल्लीत सुरू आहेत, असा गौप्यस्फोट शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. यानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती. दरम्यान, यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार म्हणाले की, मला काही माहिती नाही. मुख्यमंत्री बदलायचा निकाल आम्हाला सांगायचं कोणाला कारण नाही. असं काही आहे असं माझ्या कानावरही नाही. हे राऊतांचं स्टेटमेंट असलं तरी ते पत्रकार आहेत ते तुम्हा पत्रकार लोकांना अधिक माहिती असते.
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल असं विधान केलं होतं. यानंतर त्यांचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर लागले आहेत. यावरून आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार म्हणाले की, भावी मुख्यमंत्र्यांच्या पोस्टरवरून अजित पवारांनीच स्पष्टीकरण दिलं आहे की असा वेडेपणा करू नका. पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा असल्यासंदर्भात उद्धव ठाकरेंसोबत कोणतीही चर्चा झालेली नाही.





