अतिक अहमदच्या हत्येनंतर स्वरा भास्करचं ट्वीट चर्चेत; म्हणाली,..
बुलडोझर आणि एन्काऊंटरने फक्त हुकूमशाही येईल - फहाद अहमद
![Swara Bhaskar said that deliberate killing of a person without legal authority is not something to celebrate](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/04/swara-bhaskar-and-atiq-ahmad-780x470.jpg)
दिल्ली : गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेचा विषय ठरलेला उत्तर प्रदेशातील कुख्यात गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद या दोघांची शनिवारी रात्री गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. त्यांना वैद्यकीय चाचणीसाठी प्रयागराज येथील वैद्यकीय महाविद्यालयात नेताना पोलिसांच्या ताब्यात असताना हा हल्ला झाला. या प्रकरणी पोलिसांनी तीन हल्लेखोरांना अटक केली आहे. या घटनेवर विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, याबाबत अभिनेत्री स्वारा भास्कर हिनेसुद्धा या घटनेबाबत ट्विट केलं आहे.
कायदेशीर अधिकाराशिवाय एखाद्या व्यक्तीची जाणीवपूर्वक हत्या किंवा एन्काऊंटर ही काही साजरी करण्यासारखी गोष्ट नाही. ही अराजकतेची स्थिती दर्शवते. राज्यातील संस्थांची विश्वासार्हता संपुष्टात आली आहे, हे यातून सूचित होतं. कारण ते गुन्हेगारांसारखे वागत आहेत आणि गुन्हेगारांना सक्षम करत आहेत. याला भक्कम शासन म्हणता येणार नाही, ही अराजतता आहे, असं ट्वीट स्वारा भास्करने केलं आहे.
स्वरा भास्करचा पती आणि समाजवादी पार्टीचा नेता फहाद अहमद यानेसुद्धा याप्रकरणी ट्विट केलं आहे. अनेकांना वाटेल की आम्ही मुस्लीम आहोत म्हणूनच आम्ही असद अहमदच्या एन्काउंटरला विरोध करत आहेत. मात्र हा तुमचा गैरसमज आहे. आम्ही विकास दुबेच्या एन्काऊंटरचंसुद्धा समर्थन केलं नव्हचं आणि कधी करणारही नाही. मला तुमच्याशी समस्या आहे. तुमचा राज्यघटना आणि संस्थांवर विश्वास नाही. असदचं प्रकरणं एकदन स्पष्ट होतं. त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली असती आणि तो आयुष्यभर तुरूंगात राहिला असता. जर तुरूंगात त्याने गुंडगिरी करण्याचा प्रयत्न केला असता तर त्याला सरकार जबाबदार असती. बुलडोझरने किंवा एन्काऊंटने गुन्हेगारी संपेल या भ्रमात तुम्ही लोकं आहेत. पण बुलडोझर आणि एन्काऊंटरने फक्त हुकूमशाही येईल बाकी काही नाही, असं फहाद अहमद यांनी म्हटलं आहे.