उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मुंबई महापालिकेत ९०० कोटींचा घोटाळा?
दहिसरमध्ये ९०० कोटींचा जमीन घोटाळा; किरीट सोमय्या यांचा आरोप

मुंबई : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मुंबई महापालिकेत दहिसरमध्ये ९०० कोटींचा जमीन घोटाळा केला असल्याचा, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. या प्रकरणी किरीट सोमय्या यांनी बोरिवली पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
२०१९ मध्ये महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले. यावेळी ठाकरे सरकारने दहिसरमधील ९०० कोटींचा भुखंड एका बिल्डरला देण्याचा निर्णय घेतला. १० वर्षांपूर्वी निशल्प रिऍलिटीने दहिसर येथील ७ एकर जमिनीच्या खरेदीचा प्रस्ताव मांडला होता, पण तो स्वीकारला गेला नाही, या जागेवर १०० टक्के अतिक्रमणे आहेत. महानगर पालिकेने जमीन खरेदीचा प्रस्ताव फेटाळला. या जमिनीची किंमत १५ केटी रूपये देखील नाही, पण ठाकरे सरकार येताच हाच भुखंड ३५४ कोटी रूपये देऊन विकत घेण्यात आला. आता ब्लिडर पुन्हा साडेपाचशे कोटी रूपये मागतोय, असा हा ९०० कोटींचा भुखंड घोटाळा असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.
महापालिकेचे तत्कालीन आयुक्त प्रवीण परदेशी यांनी ३५४ कोटी रूपयांवरही भूखंड खरेदीसाठी निश्चित करण्यात आलेल्या ३५४ कोटी रूपयांवरही आक्षेप नोंदवला होता. मात्र, असे असतानाही ठाकरे सरकारकडून पैसे देण्यासाठी मनपाला सूचना देण्यात आल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.





