Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय
महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका लवकरच! भाजप मंत्र्याचं मोठं वक्तव्य
![Municipal, Zilla Parishad elections soon](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/04/supreme-court-of-india-1-780x470.jpg)
मुंबई : राज्यातील महापालिका, जिल्हा परिषद तसेच नगरपालिका निवडणुका प्रलंबित आहेत. गेल्या काही दिवसांपासून ओबीसी आरक्षण प्रभागरचना यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या सूनवणीचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने निवडणुका कधी होतील असा प्रश्न सतत विचारला जात आहे. अशातच भाजपचे नेते अतुल सावे यांनी मोठं वक्तव्य केले आहे.
ओबीसी आरक्षण, प्रभागरचना याप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकेवर तीन महिन्यांत याबाबत कोर्टाचा निर्णय येण्याची अपेक्षा मंत्री अतुल सावे यांनी वर्तवली आहे. तसेच न्यायालायाचा निकाल आल्यास त्यानंतर नगर परिषद, मनपा व जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा विषय मार्गी लागू शकेल, असं अतुल सावे म्हणाले आहे.