IPL 2023 : आयपीएलचा पहिला सामना कोण जिंकणार?
आज गुजरात विरूद्ध सीएसके संघ भिडणार
![Today Gujarat vs CSK match](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/GT-vs-CSK-780x470.jpg)
GT vs CSK : क्रिकेटच्या चाहत्यांसाठी मोठी खुशखबर आहे. आज आयपीएलला सुरूवात होणार आहे. आज होणाऱ्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स विरूध्द गतविजेता गुजरात टायटन्स हे तगडे संघ भिडणार आहेत. हा सामना आज (31 मार्च) संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे. तर सायंकाळी 6 वाजता आयपीएलचा उद्घाटन सोहळा पार पडणार असून यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया, रश्मिका मंदान्ना, कतरिना कैफ, टायगर श्रॉफ आणि अरिजित सिंह परफॉर्म करणार आहेत.
धोनीच्या नेतृत्वात खेळणारा चेन्नई आणि हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळणारा गुजरात संघ या दोघांची इच्छा असेल की हंगामातील सुरूवातीचा सामना जिंकावा. यासाठी दोन्ही संघ आज लढणार आहेत.
गुजरात जायंच्स संभाव्य संघ :
अभिनव मनोहर, शुभमन गिल, केन विल्यमसन, हार्दिक पंड्या (कर्णधार), राहुल तेवतिया, मॅथ्यू वेड, रशीद खान, शिवम मावी, अल्झारी जोसेफ, मोहम्मद शमी, यश दयाल, श्रीकर भारत, वृद्धिमान साहा, साई सुधरसन, उर्विल पटेल , विजय शंकर, रविश्रीनिवासन साई किशोर, ओडियन स्मिथ, जयंत यादव, जोशुआ लिटल, दर्शन नळकांडे, नूर अहमद, मोहित शर्मा, प्रदीप सांगवान.
चेन्नई सुपर किंग्ज संभाव्य संघ :
डेव्हॉन कॉनवे, रुतुराज गायकवाड, अंबाती रायडू, मोईन अली, बेन स्टोक्स, शिवम दुबे, रवींद्र जडेजा , एमएस धोनी (कर्णधार) , ड्वेन प्रिटोरियस, दीपक चहर, सिमरजीत सिंग, अजिंक्य रहाणे, शुभ्रांशू सेनापती, शेख रशीद, निशांत सिंधू, मिचेल सँटनर, भगत वर्मा, तुषार देशपांडे, राजवर्धन हंगरगेकर, अजय जाधव मंडल, प्रशांत सोळंकी, आकाश सिंग.