TOP News । महत्त्वाची बातमीमहाराष्ट्रमुंबईराष्ट्रिय
मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट वाहतुकीसाठी बंद
![Parashuram Ghat on Mumbai-Goa highway closed for traffic](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/02/Mubai-Goa-.jpg)
मुंबई : मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात रस्त्याच्या कामादरम्यान डोंगराची माती रस्त्यावर आली. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. घाटाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्या आहेत. दोन्ही बाजूची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. मात्र प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याने चाकरमन्यांचे हाल झाले आहेत. त्यामुळे तुम्ही जर या मार्गाने विकेण्डला जाण्याचा प्लॅन करत असाल तर हा रद्द करा किंवा बदलला नाहीतर तुम्हीही असे अडकू शकता. अगदी दोन दिवस जरी सुट्टी असेल तरी लगेच गावची वाट धरली जाते. अशावेळी जर तुम्ही मुंबई-गोवा महामार्गाने प्रवास करायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे.