राणे-राऊतांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं रंगले राजकारण…
![auto_awesome Translate from: Marathi 50 / 5,000 Translation results Translation result Allegations and counter-allegations between Rane and Raut rangle politics…](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/01/Rane-Raut.jpg)
मुंबई : भाजप नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण चांगलंच रंगताना दिसत आहे. आज पुन्हा राणे यांनी राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजप नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण चांगलंच रंगताना दिसत आहे. संजय राऊत यांची जेलवारी पक्की असं नारायण राणे यांनी म्हटलं होतं. त्यानंतर संजय राऊत देखील चांगलेच आक्रमक झाले. राजवस्त्र सोडून या मग बघू असं राऊत यांनी म्हटलं. तसेच ईडीच्या कारवाईने आम्ही पक्ष बदलणारे नाहीत, पक्षासाठी जेलमध्ये गेलो होतो असा खोचक टोला राऊत यांनी लगावला होता. आता संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना नारायण राणे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
नेमकं काय म्हणाले राणे?
आपल्यावरील टीकेला प्रत्युत्तर देताना नारायण राणे यांनी संजय राऊत यांना जोरदार टोला लगावला आहे. मी शिवसेना संपवण्याची सुपारी घेतली नाही. तर संजय राऊत यांनीच शिवसेना संपवली. आज त्यांना शिवसेना संपवल्याचा आनंद होत असेल. त्यांनी शिव्या देण्यापलिकडे कोणतंही काम केलं नाही. मला आज नाही 1990 पासून मला संरक्षण आहे. संजय राऊत तेव्हा लोकप्रभामध्ये लेख लिहीत होते असा टोला नारायण राणे यांनी लगावला आहे.