भाजपा प्रदेश कार्यालयातील कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त भेटवस्तू वाटप
![Distribution of gifts to employees of BJP state office on the occasion of Diwali](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/10/WhatsApp-Image-2022-10-29-at-1.54-780x470.jpg)
मुबंई : भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयातील कर्मचाऱ्यांना “कामगार मोर्चा” च्या वतीने प्रदेशाध्यक्ष गणेश ताठे यांच्या हस्ते दिवाळी निमित्त मिठाई आणि भेट वस्तूचे वाटप करण्यात आले.
यावेळी प्रदेश सरचिटणीस प्रमोद जाधव, डॉ. प्रिताताई व्हिक्टर, हनुमंत लांडगे, प्रदेश सदस्य मंगेश चव्हाण, अविनाश देवकर, राजेश सोनवणे हे उपस्थित होते. कामगार मोर्चा शिष्टमंडळाने प्रदेश कार्यालयाचे सचिव मुकुंद कुलकर्णी, सहसचिव भरत राऊत यांची विशेष भेट घेऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
प्रदेश कार्यालयातील अधिकारी, काॅम्पुटर ऑपरेटर, लिपिक, मिडीया सेल कर्मचारी, टेलिफोन ऑपरेटर, वाहनचालक, सहाय्यक, वाॅचमन, सफाई सेवक म्हणून कार्यरत असणा-या अशा ५९ जणांनी मिठाई आणि भेट वस्तूंचा स्विकार करुन कामचार मोर्चाचे आभार व्यक्त केले.
भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा “श्रमेवजयते” हा विचार अंत्योदयपर्यंत पोहविण्यात कामगार आघाडी कटिबद्ध आहे, अशी भावना कामगार आघाडी प्रदेशाध्यक्ष गणेश ताठे यांनी व्यक्त केली.