कीर्ती विद्यालय येथे फिजिओथेरपी व वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन
![Physiotherapy and medical examination camp organized at Kirti Vidyalaya](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/09/072219-cn19-stethoscope.jpg)
निगडी | स्वर्गीय निगडी श्री फकीरभाई पानसरे एज्युकेशन फाउंडेशनच्यावतीने जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त निगडी येथील कीर्ती विद्यालय येथे फिजिओथेरपी व वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या मोफत शिबिराचा लाभ निगडी परिसरातील 150 नागरिकांनी लाभ घेतला.
या मेळाव्याला ज्येष्ठ नागरीकांची उपस्थिती लक्षणीय होती.यावेळी विविध तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली हाडांचे उपचार, हाडांच्या ठिसूळतेची तपासणी, स्त्रीरोग उपचार, नेत्र रोग तपासणी, रक्त तपासणी व भौतिकोपचार आदी तपासण्या करण्यात आल्या.माजी महापौर आझमभाई पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या कार्यक्रमात निगडी ज्येष्ठ नागरिक संघाने सहकार्य केले.उद्घाटनप्रसंगी उपस्थिती ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा श्रीमती चांदबी सय्यद, कॉलेजच्या संचालिका डॉ. झोया पानसरे, प्राचार्य डॉ. वर्षा कुलकर्णी, ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष श्री इंगोले, सुभाष जोशी, दलिचंद सिंघवी व इतर सदस्य उपस्थित होते.स्वागत प्राचार्य वर्षा कुलकर्णी यांनी केले.सूत्रसंचालन डॉ.श्वेता पाचपुते व डॉ.पल्लवी चिचोलीकर यांनी केले. डॉ. श्रुती मुळावकर यांनी आभार मानले.
फिजिओथेरपी विषयी जनजागृती व्हावी यासाठी स्वर्गीय श्री फकीरभाई पानसरे कॉलेज ऑफ फिजिओथेरपी आणि IAPWC पुणे यांच्या सहयोगाने शनिवारी (दि.10) चिंचवड येथील गोखले वृंदावन सोसायटी येथे फिजिओथेरपी जनजागृती पथनाट्याचे आयोजन केले होते.प्राचार्य डॉ.वर्षा कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.डॉ. गार्गी भालेकर, डॉ. नेहा देशपांडे, डॉ.लावण्या अय्यर, डॉ.भाग्यश्री बडवे, डॉ.नमिता व राजू शिंगोटे यांनी संयोजनात सहभाग घेतला.