मुख्यमंत्री माझे भावोजी, पोलिसांशी हुज्जत घातल्याचा व्हीडिओ व्हायरल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/man-ruckus.jpg)
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक व्यक्ती पोलासाशी हुज्जत घालत आहे. पोलिसांनी तपास करत असताना त्या व्यक्तीला कागदपत्रांची विचारणा केली. त्यावेळी मुख्यमंत्री माझे भावोजी असल्याची धमकी त्या व्यक्तीने पोलिसांना दिल्याचे दिसत आहे.
मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमधील हे प्रकरण आहे. एका व्यक्तीने वाहतूकीच्या नियमांचे पालन न केल्यामुळे त्याला दंड आकारण्यात आला. ‘मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान माझे भावोजी आहेत.’ असे म्हणत त्या व्यक्तीने गोंधळ घालल पोलिसांशी हुज्जत घातली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
गुरूवारी भोपाळमध्ये पोलिस वाहणांची तपासणी करत होते. त्यावेळी राजेंद्र चौहान नावाच्या एका व्यक्तीची गाडी पोलिसांनी तपासासाठी अडवली आणि कागदपत्रे मागितली. त्यावेळी राजेंद्र चौहान यांच्याकडे वाहनांची कागदपत्रे नव्हती. त्यानंतर पोलिस कारवाई करत असताना राजेंद्र यांनी पोलिसांशी हुज्जत घातली. पोलिसांना आपण मुख्यमंत्री शिवाराज चौहान भावोजी असल्याची धमकी दिली.
पोलिसांसी हुज्जत घालताना राजेंद्र म्हणाला की, ‘तुरूंगातच टाकल आणखी काय करू शकता. इंग्रजीती बोलू नका. मुख्यमंत्री माझे भावोजी आहेत. तुम्ही स्वत:ला काय समजता.’ असे म्हणत राजेंद्र यांनी रस्त्यावर गोंधळ घातला. राजेंद्र यांच्यासोबत असलेल्या महिलाही पोलिसांना धमकावत असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, पोलिसांनी राजेंद्र चौहान यांना ३ हजार रूपयांचे चलन पाठवले आहे.
या व्हिडीओबाबत मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशी विचारणा केली. ‘उत्तर प्रदेशमध्ये माझ्या लाखो बहीणी आहेत. आणि मी खूस साऱ्या लोकांचा मेहुणा आहे. न्यायालया आपले काम करेल.’