मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांतील पाणीसाठ्यात वाढ
![Increase in water supply from seven lakes supplying water to Mumbai](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/07/Increase-in-water-supply-from-seven-lakes-supplying-water-to-Mumbai.jpg)
मुंबईः मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांतील पाणीसाठ्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने भर पडत आहे. गेल्या २४ तासांत तलावक्षेत्रात पडलेल्या पावसाने एकूण २५ दिवसांच्या म्हणजेच, सुमारे ९७ हजार दशलक्ष लीटर पाणीसाठ्याची भर पडली आहे.
मुंबईत पावसाने जूनमध्ये ओढ दिल्याने मुंबई महापालिकेने २७ जूनपासून १० टक्के पाणीकपात लागू केली होती. मात्र, तलावक्षेत्रात पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झाल्याने पालिकेने ८ जुलैपासून १० टक्के पाणीकपात मागे घेतली आहे. सध्या सात तलावांमध्ये पाच लाख १५ हजार ७३६ दशलक्ष लीटर पाणीसाठा झाला आहे. ९ जुलै रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत सात तलावांमध्ये सुमारे २९ टक्के म्हणजेच ४,१८,१२९ दशलक्ष लीटर पाणीसाठा जमा झाला आहे. २० जुलैपर्यंत एका दिवसात जोरदार वृष्टी झाल्याने एकाच दिवसात ९७,६०७ दशलक्ष लीटर पाणीसाठा वाढला. त्यामुळे सध्या सातही तलावांमध्ये ५,१५,७३६ दशलक्ष लीटर पाणीसाठा झाला आहे. हा पाणीसाठा ३५.६३ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.
एका दिवसातील पाणीसाठा
तलाव पाणीसाठा (दशलक्ष लीटर) पाणीसाठा (दशलक्ष लीटर)
९ जुलै १० जुलै
भातसा २,२३,१२१ २,६०,६७५
मोडकसागर ७५,३९८ ८४,५७६
तानसा ५७,०८७ ६३,०६८
मध्य वैतरणा ४२,७६२ ५६,८१३
अप्पर वैतरणा २,४३३ ३२,८८२
विहार १२,३०८ १२,६०७
तुळशी ५,०१८ ५,११४
एकूण ४,१८,१२९ ५,१५,७३६