चऱ्होलीतील प्राईड वर्ल्ड सिटीमध्ये ‘ओपन जीम’चे लोकार्पण
![Dedication of 'Open Gym' at Pride World City in Charholi](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/06/sachin-tapkir-1.jpeg)
- भाजपाच्या माजी स्वीकृत नगरसदस्या साधना तापकीर यांचा पुढाकार
- लॉग इसलँड, ब्रुकलीन सोसायटीतील नागरिकांनी व्यक्त केले समाधान
पिंपरी : धावपळीच्या जगात सोसायटीधारक नागरिकांना व्यायामाचे आणि निरोगी जीवनाचे धडे घेता यावेत. याकरिता भाजपाच्या माजी स्वीकृत नगरसदस्या साधना तापकीर आणि कोषाध्यक्ष सचिन तापकीर यांच्या पुढाकाराने चऱ्होलीतील प्राईड वर्ल्ड सिटीमध्ये ओपन जीम सुविधा सुरू करण्यात आली.
चऱ्होलीतील प्राईड वर्ल्ड सिटीमधील लॉग इसलँड आणि ब्रुकलिन या सोसायटीमध्ये आधुनिक साधणे असलेल्या ओपन जीमच्या साहित्याचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी माजी महापौर नितीन काळजे, माजी नगरसेविका सुवर्णा बुर्डे, अजित बुर्डे, भाजपा ओबीसी मोर्चाचे शहराध्यक्ष भाऊशेठ रासकर व तसेच इतर कार्यकर्ते व सोसायटीतील मान्यवर उपस्थित होते.
माजी स्वीकृत नगरसदस्या साधना तापकीर म्हणाल्या की, भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे व माजी महापौर नितीन काळजे यांच्या नेतृत्त्वाखाली सोसायटीतील नागरिकांच्या मागणीनुसार ओपन जीमचे साहित्य देण्यात आले. त्याचा लोकार्पण होत असताना विशेष आनंतद होत आहे.
सोसायटीतील नागरिकांनी व्यक्त केले समाधान…
अनेक दिवसांपासून येथील सोसायटीमधील नागरिकांची व्यायामाच्या साहित्यअभावी गैरसोय होत होती. त्यांनी या संदर्भात माजी स्वीकृत नगरसदस्या साधना यांच्याकडे मागणी केली होती. धावपळीच्या युगात व्यायामाला किती महत्त्व प्राप्त झाले आहे व त्यासाठी लोक आपले शरिर व्यवस्थित ठेवण्यासाठी धडपड करीत असतात. सोसायटी मधील विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी सदरची मागणी पूर्ण करण्यात आली. त्यामुळे सोसायटीतील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.