मान्सून अंदमानात जोरदार बरसला, हवामान खात्याने दिले महत्त्वाचे अपडेट
![Monsoon rains in Andamans, important update from Meteorological Department](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/Monsoon-rains-in-Andamans-important-update-from-Meteorological-Department.jpg)
मुंबई : अंदमानात मान्सून दाखल झाला असून पावसाने नैऋत्य मान्सून संपूर्ण अंदमान निकोबार बेटे, संपूर्ण अंदमान समुद्र व्यापला आहे. तर मान्सून आता दक्षिण-पूर्व / पूर्व-मध्य बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांत पुढे सरकला असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. मान्सूनचा आतापर्यंतचा प्रवाह चांगला राहिल्यामुळे यंदा वेळेआधीच मान्सून दाखल झाला आहे.
इतंकच नाहीतर, भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) यंदा मान्सून लवकर येण्याचा अंदाज वर्तवला आहे. २७ मेपर्यंत मान्सून भारतीय किनारपट्टीवर पोहोचेल आणि पहिला पाऊस केरळमध्ये पडेल, असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. तर केरळच्या किनार्याजवळ अरबी समुद्राच्या दक्षिणेकडे बहुस्तरीय मध्यम ढग दाटले आहेत. तर गोवा, केरळ आणि तामिळनाडूच्या काही भागांवरही ढगांची चादर पाहायला मिळत आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील ५ दिवस अंदमान आणि केरळमधील नजिकच्या शहरांमध्ये मुसळधार पाऊस होईल. केरळसह दक्षिण भारतातील काही राज्यांना पावसाने झोडपून काढलेलं असताना महाराष्ट्रातीलही नऊ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच मोसमी पावसाची प्रगती वेगाने होत असल्याने हा पाऊस अंदमान आणि निकोबार बेटांवर धडकून आता पुढे बंगालच्या दिशेने सरकला आहे.
हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, दक्षिणेकडील द्वीपकल्प आणि केतल्सच्या किनार्यावर, अरबी समुद्र आणि बेटांच्या क्षेत्रांवर ढगाळ वातावरण आहे. इतकंच नाहीतर मराठवाड्यातील विदर्भाच्या काही भागांतही ढगांचे वातावरण आहे. राज्यात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात पूर्वमोसमी पाऊस हजेरी लावेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.
देशातील कोणत्या राज्यांना पावसाचा तडाखा?
अनेक राज्यांमध्ये पूर्वमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली असून केरळसह मेघालय, आसाम आणि पश्चिम बंगालमध्येही मुसळधार पाऊस सुरू आहे. दुसरीकडे, उत्तर भारतात मात्र उष्णतेची लाट कायम असल्याचं चित्र आहे.