पिंपरी / चिंचवड
चुकीचा उपचार केल्याच्या गैरसमजातून डॉक्टरला मारहाण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/04/crime-against-doctor.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
डॉक्टरने केलेल्या उपचारामुळे साईड इफेक्ट झाला आहे, असा गैरसमज करून एका तरुणाने डॉक्टरला मारहाण करून जखमी केले. ही घटना मंगळवारी (दि. 12) दुपारी चार वाजता भोसरी येथे घडली.
गौरव बरमेचा (वय 27, रा. जुना जकात नाका, चिंचवडगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी जखमी डॉक्टरने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी डॉक्टर असून त्यांनी आरोपी तरुणावर उपचार केले आहेत. फिर्यादी यांनी केलेल्या उपचारामुळे त्याला साईड इफेक्ट झाला असल्याचा आरोपीने मनात गैरसमज करून घेतला. त्यातून त्याने फिर्यादी हे वैद्यकीय सेवा देत असताना त्यांना हाताने मारहाण करून कानाला दुखापत केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.