पूर्वकल्पना न देता आंदोलन केल्याप्रकरणी माथाडी कामगारांवर गुन्हा दाखल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/02/Crime-new.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
पूर्वकल्पना न देता माथाडी कामगारांनी आंदोलन केले. याप्रकरणी 27 माथाडी कामगारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 14 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी असंरक्षित कामगार मंडळ चिंचवड येथे घडली.
संजय दामोदर जोशी (वय 58, रा. शिवाजीनगर, पुणे) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मंगेश काटे, बाबा कांडर व इतर 20ते 25 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे असंरक्षित कामगार मंडळ या कार्यालयात लेखापाल म्हणून नोकरी करतात. 14 फेब्रुवारी रोजी माथाडी कामगारांनी पगाराची सर्व रक्कम का दिली नाही या कारणावरून बेकायदेशीरपणे जमाव जमवून आंदोलन केले. या आंदोलनाची पूर्वकल्पना न देता आरोपींनी स्वताच्या व इतरांच्या जीवितास धोका निर्माण केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.