कोरोनामुळे बंद असलेली आंतरराष्ट्रीय विमानसेवा २७ मार्चपासून सुरू होणार
![International flights closed due to Corona will resume from March 27](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/plane-flight-sunset-513641.jpg)
नवी दिल्ली | कोरोनाच्या निर्बंधामुळे २ वर्षांपासून बाधित झालेली आंतरराष्ट्रीय विमानसेवा येत्या २७ मार्च २०२२ पासून पुन्हा पूर्ववत सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली. २३ मार्च २०२० पासून आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवर बंदी घालण्यात आली होती. मात्र आता ती उठवण्यात आली आहे. कोरोना काळात ३७ देशांदरम्यान विशेष विमानसेवा सुरू होती. ती आता पूर्ववत होणार आहे.
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानसेवा स्थगित करण्याचा निर्णयने घेतला होता. त्यानुसार २३ मार्च २०२० पासून आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे बंद केली होती. या काळात ३७ देशांदरम्यान विशेष विमान सेवा सुरू होती. परंतु आता कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आली असल्यामुळे आंतरराष्ट्रीय विमान सेवा २७ मार्चपासून पुन्हा पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती शिंदे यांनी दिली. त्यानुसार २६ मार्च २०२२ ला मध्यरात्री १२ नंतर आंतरराष्ट्रीय विमान सेवा पूर्ववत सुरू होणार आहे, असे त्यांनी सांगितले.