breaking-newsपुणेमहाराष्ट्र

पालिकेच्या सतरा शाळांचे समायोजन

पुणे– शहरातील पालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या 17 शाळांचे त्यांच्या जवळील शाळांमध्ये विलिनिकरण करण्यात आले आहे. त्यानुसार येत्या शैक्षणिक वर्षापासून 17 शाळा या बंद करण्यात आल्या आहेत. पालिकेच्या जवळपास 290 शाळांपैकी या 17 प्राथमिक शाळांचे अन्य पालिकेच्या शाळेत विलिनीकरण करण्यात आले आहे.
यामध्ये पांडवनगर येथील संत रामदास स्वामी प्रशाला, गोखलेनगर येथील वीर बाजीप्रभू शाळा, विद्यापीठ गेट येथील स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्यालय, वानवडी येथील महादजी शिंदे शाळा, दत्तवाडीतील बा.ग.जगताप शाळा, पर्वती येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर शाळा, येरवडा येथील गेनबा मोझे शाळा, महादेव दगडू प्राथमिक शाळा, आचार्य अत्रे शाळा, केशवराव जेधे शाळा, मार्कडेय प्राथमिक शाळा, रामटेकडी येथील शारदाबाई लोंढे शाळा, मंगळवार पेठेतील बाबुराव सणस शाळा, हडपसर येथील बंटर स्कूल, संत ज्ञानदेव प्राथमिक शाळा, सर सेनापती हैबतराव शिळीमकर प्राथमिक शाळा, महात्त्मा फुले प्रशाला आदी शाळांचे अन्य जवळच्या शाळेत समायोजन करण्यात आले आहे. या शाळांचे विलिनीकरण करण्यात आल्याची माहिती पालिकेचे प्रभारी शिक्षणप्रमुख शिवाजी दौंडकर यांनी दिली.
यातील बहुतांशी शाळांमध्ये पट कमी तसेच शिक्षकांचीही कमतरता होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्येक इयत्तेसाठी शिक्षक मिळावा यासाठी पालिकेने या शाळांचे विलिनीकरण केले आहे. त्यामुळे पालिकेच्या जवळपास तीनशे हून अधिक असणारी संख्या आता आणखी कमी झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button