राज्यसेवा पूर्व परीक्षा २३ जानेवारीला होणार
![State service pre-examination will be held on 23rd January](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/MPSC-11.jpg)
पुणे | प्रतिनिधी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे सुधारित वेळापत्रकानुसार २३ जानेवारीला राज्यसेवा पूर्व परीक्षा होणार असून या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या उमेदवारांना त्यांच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमध्ये प्रवेशपत्रे उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
एमपीएससीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. राज्य सेवा पूर्व परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार २ जानेवारीला होणार होती. मात्र, कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना अर्ज सादर करण्याची संधी देण्याबाबतच्या निर्णयामुळे एमपीएससीने अर्ज करण्यास मुदतवाढ दिली. त्यामुळे सुधारित वेळापत्रक जाहीर करून ही परीक्षा २३ जानेवारीला होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. दि. २ जानेवारीच्या परीक्षेसाठी उमेदवारांना त्यांच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीत उपलब्ध करून दिलेल्या प्रवेशपत्राच्या आधारे परीक्षा कक्षात प्रवेश दिला जाईल. तर कमाल वयोमर्यादा ओलांडल्याने वाढीव मुदतीत अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना त्यांचे प्रवेशपत्र त्यांच्या प्रणालीत उपलब्ध करून देण्यात येत आहे.