Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन
#CoronaVirus: ‘चेन्नई एक्स्प्रेस’च्या निर्मात्याच्या घरावर कोरोनाचं सावट; दुसऱ्या मुलीचा रिपोर्टही पॉझिटिव्ह

‘चेन्नई एक्स्प्रेस’ चित्रपटाचे निर्माते करिम मोरानी यांची मुलगी व अभिनेत्री झोया मोरानी हिलासुद्धा करोनाची लागण झाली आहे. सोमवारी तिची छोटी बहिणी शाजा हिला करोनाची लागण झाल्याने मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शाजा श्रीलंकाहून परतली होती. मात्र तिच्यात करोनाची कोणतीच लक्षणे दिसून आली नव्हती. तर झोया मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राजस्थानहून परतली होती. तिचेही करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.
‘शाजा नानावटी रुग्णालयात दाखल असून झोयाला कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन दिवसांनंतर पुन्हा एकदा शाजाची करोना चाचणी केली जाईल. घरातील सर्व सदस्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येईल. सर्वजण क्वारंटाइनमध्ये आहेत’, अशी माहिती झोयाच्या कुटुंबीयांनी ‘पीटीआय’ला दिली.





