नवरात्रोत्सवानिमित्त प्रभाग बारामधील महिलांना घडविले महालक्ष्मी दर्शन
- भाजपा महिला मोर्चाच्या कोषाध्यक्षा अस्मिता भालेकर यांनी वाढदिवसाचा खर्च टाळून महिलांना घडविली दर्शनवारी
तळवडे- नवरात्रोत्सवानिमित्त आणि वाढदिवसाचे औचित्य साधून प्रभाग बारा मधील महिलांना कोल्हापूर महालक्ष्मी दर्शन घडविण्याचा स्तुस्त्य उपक्रम सुरु आहे. भाजपा महिला मोर्चाच्या कोषाध्यक्षा अस्मिता भालेकर यांनी वाढदिवसाचा खर्च टाळून महिलांची दर्शनवारीची इच्छा पूर्ण केली आहे. त्यामुळे परिसरातील महिलांकडून समाधान व्य़क्त केले जात आहे.
कोविड-१९ च्या प्रादुर्भावाने मागील दीड वर्षापासून कोणालाही बाहेर पडता आले नाही. अनेक सणोत्सव लॉकडाऊमुळे घरातच साजरे करावे लागले. मात्र नवरात्रोत्सवाच्या तोंडावर मंदिर उघडण्यास शासनाने परवाणगी दिली. त्यामुळे परिसरातील अनेक महिलांना दर्शनाची मनापासून इच्छा होती. त्यानुसार वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून महिलांची इच्छा पूर्ण करण्याचा संकल्प केला. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी परिसरातील महिलांची नावनोंदणी सर्व माहिती देण्यात आली. परिसरातील सुमारे दीड हजार महिलांसाठी ही दर्शनवारी आयोजित करण्यात आली आहे. आमदार महेश दादा लांडगे यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाखाली ही दर्शनवारी सुरु आहे.
कोरोनामुळे घरात बसून कंटाळलेल्या महिलांनी महालक्ष्मी दर्शनासोबतच बाहेर फिरण्याचा आनंद घेतला. महिलांच्या चेहऱ्यावरील समाधान आणि आनंद इथेच आपला वाढदिवस सार्थकी लागल्याचे समाधान आपल्याला मिळाल्याची भावना अस्मिता भालेकर यांनी व्यक्त केली.
उद्योजक अनिल भालेकर म्हणाले, आपला वाढदिवस हा महिलांच्या दर्शनवारीसाठी सत्कारणी लावण्याची इच्छा अस्मिता भालेकर यांनी व्यक्त केली. त्यानुसार नियोजन करून, प्रभागातील महिलांना येण्या-जाण्याची, दर्शनाची सर्व व्यवस्था करण्यात आली. सुमारे दीड हजार महिलांसाठी व्यवस्था कऱण्यात आली.