breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

इंद्रायणीनगरमध्ये नगरसेविका नम्रता लोंढे यांच्यातर्फे नोकरी महोत्सव

  • वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन
  • नागरी आरोग्य रक्षणासाठी घेतला पुढाकार

पिंपरी । प्रतिनिधी

इंद्रायणीनगरसह पिंपरी-चिंचवडमधील नवोदित तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात. यासाठी भाजपा नगरसेविका नम्रता लोंढे यांनी नोकरी महोत्सवाचे आयोजन केले आहे. त्याअंतर्गत शेकडो तरुणांच्या हाताला काम देण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
इंद्रायणीनगरच्या विद्यमान नगरसेविका नम्रता योगेश लोंढे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च न करता सामाजिक उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला. भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या कट्टर समर्थक अशी लोंढे यांची ओळख आहे.
याबाबत बोलताना नगरसेविका नम्रता लोंढे म्हणाल्या की, भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.२ व ३ ऑक्टोबर २०२१ रोजी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भोसरी आणि परिसरातील नवोदित युवक-युवतींसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात. यासाठी भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन केले आहे. यामध्ये ३० पेक्षा जास्त कंपन्या सहभागी होणार आहेत. इंद्रायणीनगर येथील ऐलोरा पॅलेस, से. नं. शॉप. नं. ३२, तिरुपती चौक येथे नोकरी महोत्सव आयोजित केला आहे. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी https://cutt.ly/TEbrZ1U या संकेतस्थळावर क्लिक करावे. तसेच अधिक माहितीसाठी असद खान (9890661228) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

नागरी आरोग्य संवर्धनासाठी पुढाकार…
नगरसेविका लोंढे यांच्या पुढाकाराने दि. २ ऑक्टोबर रोजी हृदयरोग मोफत तपासणी शिबीर, दातांची मोफत तपासणी, डोळ्यांची मोफत तपासणी, रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.

महिला आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान :
कोरोना काळात जीवाची बाजी लावून रुग्णसेवा आणि नागरी आरोग्य सुविधांमध्ये कर्तव्य बजावणाऱ्या महिला आरोग्य कर्मचाऱ्यांचाही सन्मान करण्यात येणार आहे. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात मार्गदर्शक आणि दिशादर्शक ठरलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करणे, हे आमचे कर्तव्य आहे. त्यासाठी इंद्रायणीनगर आणि परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन केले आहे. गणेशोत्सव काळात गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यामध्ये यशस्वी झालेल्या स्पर्धकांचा पारितोषिक वितरण समारंभ आयोजित केला आहे, असेही नगरसेविका लोंढे यांनी म्हटले आहे.

संकेतस्थळ लोकार्पण सोहळा…
इंद्रायणीनगर आणि परिसराच्या विकासासाठी सामान्य नागरिकांना सहभागी करुन घेता यावे. लोकांच्या सूचना आणि कल्पनांचा अभ्यास करता यावा. या हेतुने नगरसेविका सौ. नम्रता योगेश लोंढे यांनी मोबाईल ॲप (www.namratalondhe.in) विकसित केले आहे. त्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे, असेही नगरसेविका लोंढे यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button