देवेंद्र फडणवीसांना कायद्याचं खूप ज्ञान, पण मी दिलेले आदेश योग्यच; नाशिक पोलीस आयुक्तांचे मत
![Devendra Fadnavis has a lot of knowledge of law, but the order I gave is correct; Opinion of Nashik Police Commissioner](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/fadanvish_1572795971_618x347.jpeg)
नाशिक |
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाड येथे जन आशीर्वाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना, केलेलेल्या खळबळजनक विधानानंतर त्यांच्याविरोधात नाशिकमधील सायबर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर नाशिक पोलीस नारायण राणे यांना अटक करण्यासाठी रवाना झाले होते. याबाबात नाशिकचे पोलीस आयुक्त यांनी आज पत्रकारपरिषदेत बोलातना माहिती दिली दीपक पांडेय यांनी आज माहिती दिली. यावेळी त्यांनी माजी विरोधीपक्ष नेते खूप सुज्ञान व्यक्ती आहेत आणि त्यांना कायद्याचे खूप ज्ञान आहे. त्यांना मोठा अनुभव आहे. त्यांना माझे आव्हान नाही आहे. भारताच्या संविधानाच्या कलम २२६, २२७ खाली न्यायालयात जाऊन क्रॉस करु शकतात. माझ्या मताप्रमाणे जे आदेश आहेत ते योग्य आहेत, असे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी म्हटले आहे.
“मी तर त्या आयुक्तांच पत्र वाचलं मला आश्चर्य वाटलं ते काय स्वतःला छत्रपती समजतात का? जा त्यांच्या मुसक्या बांधा, त्यांना हजर करा कोणत्या कायद्याने हा अधिकार दिला आहे. ज्या प्रकारे पोलिसांचा वापर हे सरकार करत आहे. मला असं वाटतं पोलिसजीवी सरकार झालं आहे. प्रत्येक वेळी उच्च न्यायालयातून चपराक पडतेय,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. “ठाकरे सरकार पोलीस जीवी सरकार झालेलं आहे. माझा सल्ला आहे पोलिसांनी कायद्याने काम करावे. कायद्याच्या भाषेत हा दखलपात्र नाही. पण त्याला जबरदस्तीनं दखलपात्र गुन्हा करायचा प्रयत्न केला जातोय. पोलिसांचा गैरवापर होतोय. महाराष्ट्र पोलिसांचं काम मला माहित आहे. ते निष्पक्ष आहेत. पण आता त्या पोलिसदलाचा ऱ्हास होतोय,” असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.