Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: गृहमंत्रालय २४ तास सुरू ठेवण्याचे गृहमंत्री अमित शहांनी दिले आदेश

कोरोनामुळे देशावर व जगावर मोठं संकट कोसळलेलं आहे. त्याचा संसर्ग टाळण्यासाठी लागू करण्यात् आलेल्या लॉकडाऊनचा कालावधीही वाढवावा लागला आहे. विविध ठिकाणी लोकप्रतिनिधी दिवसरात्र काम करून कोरोनापासून जनतेला मुक्त करण्यासाठी झटत आहेत. आरोग्य सेवा पुरवणारे कर्मचारी तसंच पोलीस कर्मचारी प्राण संकटात टाकून कर्तव्य बजावत आहेत.

याच पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शहा यांनी गृहमंत्रालय २४ तास सुरू ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. लॉकडाऊनच्या काळात कुणीही विनाकारण बाहेर पडू नये, यासाठी पोलीस आता लोकांवर लक्ष ठेवून आहेत. कुणीही नियमभंगाचा प्रयत्न करू नये, असं आवाहन पोलिसांतर्फे करण्यात येत आहे. लॉकडाऊन संबंधी अनेक निर्णयही घेतले जात आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button