देशात गेल्या २४ तासांत देशात ३८ हजार ७९२ नवे रुग्ण,६२४ बाधितांचा मृत्यू
![Genetic sorting of 16,000 samples in July-August](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/corona-1-2.jpg)
नवी दिल्ली – गेल्या २४ तासांत देशात ३८ हजार ७९२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून ४१ हजार रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय. डिस्चार्ज रुग्णांची संख्या वाढत असल्याने देशातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या घटत आहे. दुसरीकडे मृतांच्या संख्येत मात्र चढ-उतार होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत देशात ६२४ बाधितांचा मृत्यू झाला आहे.
आजच्या नव्या कोरोना रुग्णसंख्येमुळे देशातील एकूण बाधितांचा आकडा 3 कोटी 9 लाख 46 हजार 74 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 1 लाख 4 हजार 720 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 11 हजार 408 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 4 लाख 29 हजार 946 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.
आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 38 कोटी 76 लाख 97 हजार 935 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी
देशात 24 तासात नवे रुग्ण – 38,792
देशात 24 तासात डिस्चार्ज – 41,000
देशात 24 तासात मृत्यू – 624
एकूण रूग्ण – 3,09,46,074
एकूण डिस्चार्ज – 3,01,04,720
एकूण मृत्यू – 4,11,408
एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 4,29,946
आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 38,76,97,935