आज अक्षय्य तृतीया! जाणून घ्या सोन्याचे दर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/gold.jpg)
मुंबई – आज अक्षय्य तृतीया. साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक असणारा हा दिवस. हिंदू पंचांगामध्ये या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वैशाख महिन्यात येणारी शुक्ल पक्षाची तृतीय तिथी या दिवशी साजरी केली जाते. अनेक शुभकार्यांसाठी या दिवसाला प्राधान्य देण्यात येते. या दिवशी सर्वत्र मंगलमय वातावरणाची अनुभूती होते. अतिशय शुभ पर्व मानल्या जाणाऱ्या या दिवशी अनेक शुभकार्य पार पडतात, नव्या वस्तूंची खरेदीही करण्यात येते. सर्वाधिक प्राधान्य असते ते म्हणजे सोने खरेदीला. त्यामुळे जाणून घेऊया आजचे सोन्याचे दर.
आज सोन्याचे दर प्रती 10 ग्रॅम 22 कॅरेटसाठी 45 हजारांच्या जवळपास असल्याचे पाहायला मिळत आहे. तर 24 कॅरेट सोन्यासाठी प्रती 10 ग्रॅमवर 45,720 रुपये मोजावे लागत आहेत. मात्र कोरोना संकटामुळे लागू करण्यात आलेले लॉकडाऊनचे नियम आणि निर्बंध पाहता याचा थेट परिणाम सराफा बाजारावर होणार आहे. मागील वर्षीप्रमाणे यंदादेखील नागरिक प्रत्यक्षात सोने खरेदीसाठी कमीच प्राधान्य देताना दिसत आहेत. मात्र सराफा बाजारात जाऊन किंवा पेढीवर प्रत्यक्षात जाऊन सोने खरेदीचा पर्याय यंदाही उपलब्ध नसला तरीही पेपर गोल्ड आणि डिजिटल गोल्ड असे पर्याय ग्राहकांसाठी उबलब्ध आहेत. त्यामुळे अनेख्या मार्गाने सोने खरेदीचा पर्याय सर्वांना उपलब्ध होणार आहे.
महत्त्वाच्या शहरांत 22 आणि 24 कॅरेट सोन्यासाठी प्रती 10 ग्रॅममागे आजचे दर :
मुंबई – 44720 (22 कॅरेट), 45720 (24 कॅरेट)
दिल्ली – 45900 (22 कॅरेट), 49900 (24 कॅरेट)
चेन्नई – 45,000 (22 कॅरेट), 49090 (24 कॅरेट)
कोलकाता – 45800 (22 कॅरेट), 49560 (24 कॅरेट)
बंगळुरू – 44500 (22 कॅरेट), 48560 (24 कॅरेट)
हैदराबाद – 44500 (22 कॅरेट), 48560 (24 कॅरेट)