#Covid-19: ४३ टक्के लसीकरण पाच राज्यांत
![43% vaccination in five states](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/vaccine-3.jpg)
महाराष्ट्र |
भारतात आतापर्यंत झालेल्या एकूण कोविड १९ विषाणू प्रतिबंधक लसीकरणापैकी ४३ टक्के लसीकरण हे प्रामुख्याने पाच राज्यांत झाले आहे. त्यात महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल यांचा समावेश आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत एकूण ७ कोटी ५९ लाख ७९ हजार ६५१ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. त्यात वरील पाच राज्यांत ३ कोटी २२ लाख १० हजार ४३७ जणांचे लसीकरण केले आहे. त्यात २ कोटी ९१ लाख ५४ हजार ५७७ जणांना पहिली मात्रा देण्यात आली असून ४४ लाख ५५ हजार ८६० जणांना दुसरी मात्रा देण्यमत आली आहे. महाराष्ट्रात ७३ लाख ५४ हजार २४४ जणांचे लसीकरण झाले असून हे प्रमाण देशातील एकूण लसीकरणाच्या ९.६८ टक्के आहे.
गुजरातेत ६९ लाख २३ हजार ८ जणांचे लसीकरण झाले असून हे प्रमाण देशाच्या तुलनेत ९.११ टक्के आहे. उत्तर प्रदेशात ६६ लाख ४३ हजार ९६ इतके लसीकरण झाले असून ते देशातील प्रमाणाच्या ८.७४ टक्के आहे. राजस्थानात ६४ लाख ३१ हजार ६०१ जणांचे लसीकरण करण्यात आले असून हे प्रमाण देशाच्या तुलनेत ८.४६ टक्के आहे. पश्चिम बंगालमध्ये ५९ लाख ५८ हजार ४८८ जणांना लस देण्यात आले असून हे प्रमाण देशाच्या तुलनेत ७.८४ टक्के आहे. महाराष्ट्र व उत्तर प्रदेश या राज्यात सर्वात जास्त रुग्ण असून महाराष्ट्रात दिवसभरात ४९,४४७ रुग्णांची वाढ होऊन एकूण संख्या २९ लाख ५३ हजार ५२३ झाली आहे. एका दिवसातील सर्वाधिक वाढ महाराष्ट्रात नोंदली गेली आहे. महाराष्ट्रात २७७ बळी गेले असून एकूण बळींची संख्या आता ५५ हजार ६५६ झाली आहे. उत्तर प्रदेशात शनिवारी १४ बळी गेले असून एकूण ३२९० नवीन रुग्ण सापडले आहेत. उत्तर प्रदेशात एकूण ६ लाख २५ हजार ९२३ जणांना संसर्ग झाला आहे.
वाचा- ‘बांधवगड व्याघ्र प्रकल्पातील आग मानवी हस्तक्षेपामुळेच’