पुण्यात लॉकडाऊन नाही, निर्बंध आहेत; ३१ मार्चपर्यंत शाळा बंदच : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत निर्णय
![There is no lockdown in Pune, there are restrictions; Schools closed till March 31: Decision in the meeting of Deputy Chief Minister Ajit Pawar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/Ajit-Pawar-PCMC.jpg)
पुणे | प्रतिनिधी
पुण्यात लॉकडाऊन लागू करण्यात येणार नसून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी निर्बंध कडक केले जाणार आहेत. रात्रीची संचारबंदी असणार आहे. 31 मार्च पर्यंत शाळा कॉलेज बंद राहणार आहेत. हॉटेल ,बार ,रेस्टॉरंट रात्री 10 वाजेपर्यंत सुरु ठेवता येणार आहेत.
वाचा :-पुणे शहरात लॉकडाऊन नाही, मात्र निर्बंध वाढवले : महापौर मुरलीधर मोहोळ
कोरोना नियंत्रण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज (शुक्रवारी) बैठक झाली. या बैठकीत निर्बंध कडक करण्याचा निर्णय घेण्यात आले. पुणे जिल्ह्यातील 31 मार्च पर्यंत शाळा कॉलेज बंद राहणार आहेत. ( दहावी बारावी परीक्षा वगळून), रात्रीची संचारबंदी 11 वाजल्यापासून सुरू राहणार आहे. हॉटेल ,बार ,रेस्टॉरंट रात्री 10 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. पार्सल सेवा 11 वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहे.
हॉटेल रेस्टॉरंट यांना 50 टक्के आसन क्षमतेची परवानगी दिली आहे. त्याबद्दलचा फलक हॉटेलच्या दर्शनी भागावर लावावा लागणार आहे. दशक्रिया, अंतयात्रेला लग्न,समारंभला 50 जणांची उपस्थिती. उल्लंघन केल्यास पोलीस कारवाई केली जाणार आहे. प्रसंगी जागा मालकावर देखील कारवाई. तसेच जागा देखील सील केली जाणार आहे.
गृहनिर्माण सोसायटीमधील क्लब हाऊस बंद ठेवण्यात येणार आहेत. मॉल सिनेमा हॉल रात्री दहा वाजता बंद केले जाणार आहेत. रस्त्यांवरील टपऱ्यांवर पाच पेक्षा जास्त लोकांना एकावेळी थांबता येणार नाही.