देशात सर्वाधिक ऍक्टिव्ह रुग्ण महाराष्ट्रात
![Maharashtra has the most active patients in the country](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/02/korona.jpg)
मुंबई – देशात सर्वाधिक ऍक्टिव्ह रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. काही दिवसांपूर्वी राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला होता आणि सर्वाधिक ऍक्टिव्ह रुग्ण हे केरळमध्ये होते, मात्र आता पुन्हा एकदा महाराष्ट्रातील ऍक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. महाराष्ट्रात सध्या ७२,५३० ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
वाचा :-राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 21,46,777 वर
महाराष्ट्रात शनिवारी दिवसभरात ३,६४८ रुग्ण बरे होऊन घरी गेले, यासह राज्यातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या २०,२०,९५१ इतकी झाली असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.१४% एवढे झाले आहे. तसेच काल राज्यात ८,६२३ नवीन रुग्णांचे निदान झाले, तर ५१ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.४३ % एवढा आहे. तसेच आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,६१,९९,८१८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१,४६,७७७ (१३.२५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३,३४,१०२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत, तर ३,०८४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
दरम्यान, राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २१ फेब्रुवारी २०२१ रोजी जनतेला संबोधित करताना म्हटले होते, लॉकडाऊन टाळायचा असेल तर मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंगसह इतर नियमांचे पालन करा. पुढील आठ दिवस पाहणार आणि त्यानंतर पुढील निर्णय घेणार. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलेल्या संबोधनाला आज म्हणजेच २८ फेब्रुवारी रोजी आठवडा होत आहे आणि राज्यातील रुग्ण संख्याही वाढत आहे त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कुठला मोठा निर्णय जाहीर करणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.